जलसंपदा विभागाच्या बैठकीत सिंचनाच्या प्रमुख मागण्याकडे वेधले लक्ष

जलसंपदा

हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : जलसंपदा विभागाच्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प , विष्णुपुरी प्रकल्प , पूर्णा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मी डेरला, विष्णुपुरी प्रकल्प,पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी, येलदरी कालवा आणि हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष याबाबत प्रश्न उपस्थित करून तात्काळ हे पूर्ण करावेत अशी मागणी केली.

 

नांदेड जिल्ह्यातील डेरला लिफ्ट प्रकल्पासाठी 12 वर्षांपूर्वी 75 कोटी रूपये खर्च केले व कंत्राटदराने सर्व पैसे उचलून घेतले पण अद्याप पर्यंत या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. याबाबत प्रश्न उपस्थित करून मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.तसेच विष्णुपुरी प्रकल्पलातून शेतकऱ्यांना शेतीसाठी चार वेळा पाणी सोडण्यात यावे. पैनगंगा नदीमध्ये पिण्याच्या पाण्याची यापूर्वी करण्यात आलेली तरतूद अपुरी आहे. उन्हाळ्यात नदी काठच्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे हि पाण्याची तरतूद आता १.२५ वरून २ टीएमसी करण्यात यावी. व फेब्रुवारी व मे महिन्यात उनकेश्वर पर्यंत पाणी सोडण्यात यावे.

 

पैनगंगा नदीवर मंजूर झालेले सात बंधारे लवकरात लवकर पूर्ण करावेत. अशी मागणी केल्यांनतर मा. मंत्री महोदय ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हि मागणी मान्य करत हे सात हि बंधारे येत्या २ वर्षात पूर्ण करून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ते म्हणाले.

हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणातून कालवा काढुन जास्तीत जास्त लाभ हा हिंगोली , सेनगाव तालुक्यांना व्हावा यासाठी मंजुरी देण्यात आली होती. आणि याबाबतचे जे सर्वेक्षण करण्यात येणार होते ते पूर्ण करण्यात यावेत.तसेच हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूर करण्यात आलेले 300 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावेत. पैनगंगा नदीतून जाणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here