नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवळा तालुक्यातील तुषार्थ जनतेला जलसमृद्ध करण्यासाठी गिरणा नदीच्या पात्रात कायम चा पाणी साठा उपलब्ध व्हावा म्हणून नविन कोल्हापूर टाईप बंधारे उभारून कायमस्वरूपी पाणी अडवून कसमादेचे विकासाचे केंद्र असलेला वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना सुरू करून भविष्यात ऊस लागवडीच्या योजनेच्या माध्यमातून वसाका सुरू करण्याचा आपला मानस आल्याचे प्रतिपादन देवळा चांदवड तालुक्याचे नवनिर्वाचीत आमदार डॉ राहुल आहेर यांनी रविवारी (दि २) रोजी विठेवाडी येथील सर्व पक्षीय शेतकरी मेळाव्यात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसाका चे मा,संचालक बाबुराव पाटील हे होते तर व्यासपीठावर मा, संचालक वसंत निकम, अशोक बोरसे , भास्कर निकम ,उमराने बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे हे होते.

यावेळी डॉ आहेर पुढे म्हणाले की ,गेल्या अनेक दिवसांपासून वसाका बंद अवस्थेत आहे त्यामुळे परिसरातील सभासद शेतकरी व कामगार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे वसाका पुन्हा सुरू करण्याकामी कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध नसल्याने बाहेरच्या गेट केनच्या भरवशावर कारखाना चालवणे कठीण आहे.भविष््यात यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहिली तरच ऊस लागवडीकडे शेतकरी वळेल, कसमादेचे शेतकरी उसाच्या शेतीला पर्याय म्हणून कमी कालावधीत येणाऱ्या कांदा,मका,व इतर पिकांकडे वळत आहे, येत्या पावसाळ्यात विठेवाडी येथील नुतन बंधाऱ्यात पाणी आणणार असून, या कामासाठी भविष्यात गिरणा नदीच्या अवर्तनात थोडा फार बदल झाला तर याच वर्षी सावकी येथील नियोजित के टी वेअर पूर्ण करण्याचा आपला अटोकाट प्रयत्न असून,तसे झाल्यास याच पावसाळ्यात दोनही के टी वेअर मध्ये पाणी अडवण्याचाप्रयत्न आपण करणार असून, भविष्यात तालुक्यांतील सुरवातीच्या क्षेत्रापासून पासून तर शेवटच्या ठोका पर्यंत नदीपात्रात गावालगत के टी वेअर बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे गिरणा नदी पात्रा लगतच्या दोनही बाजूच्या गावांना त्याचा लाभ होऊन शेती पाणी प्रश्ना बरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यास मदत होईल .असे शेवटी आमदार डॉ आहेर यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी विठेवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला,, तसेच विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने डॉ राहुल आहेर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव व त्यांच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला , विलास निकम , या वेळी, महेंद्र आहेर कुबेर जाधव ,राजेंद्र निकम,शशिकांत निकम, तानाजी निकम समाधान निकम, राहुल निकम,प्रशांत निकम ,संजय सावळे,तकदीर कापडनिस, कैलास निकम, सुभाष निकम,भिका शेळके,भास्कर सुकदेव निकम,धनाजी निकम, पी डी निकम,संदीप निकम,नितीन निकम,अशोक आहेर,मिलिंद निकम,कैलास कोकरे,बाळू सोनवणे, राहुल निकम,ईश्वर निकम, दयाराम निकम , पंडितराव निकम,रामा निकम, रमेश निकम,विरु निकम,अमर जाधव, भैय्या जाधव शँकर निकम ,माणिक निकम,जिजाउ बोरसे, काशिनाथ बोरसे, धंनजय बोरसे, राजेंद्र बोरसे, मधुकर वाघ, भालचंद्र निकम, देविदास निकय , संजय निकम,गणु निकम,रविंद्र कापडनिस,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजेंद्र निकम यांनी मानले .







