संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीड बंदला हिंसक वळण

बीड बंदला हिंसक वळण

बीड (प्रतिनिधी) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ११ तालुक्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. तर काही ठिकाणी बंदल हिंसक वळण लागलं.

 

केजमध्ये संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लोक आक्रमक झाले. धारूर चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. धारूर चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या संपूर्ण हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी केजमध्ये धारूर चौकात कार्यकर्त्यांनी टायर पेटवले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली.

 

हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतापाची लाट उसळली आहे. या हत्येच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोर धरत आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी घ्या, धनंजय मुंडे यांच्यावर देखील खंडणी आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here