शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डीमध्ये भारतीय किसान संघाचा स्थापना दिवस जय बलराम जय किसान च्या घोषणा देत साजरा करण्यात आला. दिनांक ४ मार्च, १९७९ रोजी राजस्थान मधील कोटा या गावी या संघटनेची स्थापना श्रीमान दत्तोपंतजी हेंगडी यांच्या प्रयत्नाने झाली. आजही दत्तोपंत ठेंगडी’ यांना भारतीय किसान संघाचे संस्थापक म्हटले जाते, राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डी शहरात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव गोंदकर यांचे अध्यक्षतेखाली हा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भारतमाता, व बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच या स्थापना दिनाचे औचित्य साधून तालुका पदाधिकाऱ्यांची तालुकास्तरीय बैठक ‘पार पडली,याबैठकीत भारतीय शेती व शेतकरी यावरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या चर्चेत दिलीपराव गोंदकर,गंगाधर चौधरी,सिताराम चौधरी,अनिल मते,यांची आपली भूमिका या चर्चेत मांडली.
यावेळी गंगाधर चौधरी,अनिल मते, गंगाधर सावदे, रंगनाथ चौधरी, प्राचार्य अ.नि चौधरी, श्री बी.डी. गवारे सर, दिलीप कुलकर्णी सर, तालुकाध्यक्ष सिताराम चौधरी, संजय दंडवते,राजेद्र सांबारे, अशोक कोते आदींसह किसान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.







