सुसज्ज प्ले क्लासरूम उद्घाटन सोहळा संपन्न

सुसज्ज प्ले क्लासरूम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल आणि व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्ले क्लासरूम उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

 

 

स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने व्ही.पी.एस च्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा देणारे विविध कामे ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहेत. इमारतीला रंगकाम, फर्निचर, पार्किंग, शालेय इमारतीचे शुशोभीकरण, टॉयलेटबाथरूम असे विविध कामे शालेय परिसरामध्ये चालू आहेत. स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी श्री.मनीष कुकरेजा यांच्या मनातील सुसज्ज प्ले क्लास रूम शालेय परिसरामध्ये तयार करण्यात आली. मनीषभाई यांनी स्वतः डिझाईन केलेल्या प्ले क्लास रूमचे उद्घाटन आज शालेय परिसरामध्ये झाले.

 

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्री.विजयकुमार कुकरेजा (सचिव स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट), सौ.सुरेखा कुकरेजा, श्री.मनीष कुकरेजा, सौ.पूनम कुकरेजा, (ट्रस्टी स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट ), श्री.राजू खांडेभरड (मा. सरपंच वरसोली), डॉ.सतीश गवळी (कार्यवाह विद्या प्रसारिणी सभा पुणे), श्री. भगवानभाऊ आंबेकर (नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष ), ॲड.संदीप अगरवाल (नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष बीसीएस कॉलेज), श्री.कन्हैया भुरट (शाळा समिती अध्यक्ष इंग्लिश टीचिंग स्कूल), श्री.राजेश मेहता (शाळा समिती सदस्य), श्री.नितीन शहा, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, मुख्य लिपक श्री.कुंडलिक आंबेकर, मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव, सौ. भारती लोखंडे, सौ. ललिता कन्नन, सौ. अन्नपूर्णा सूर्यवंशी उपस्थित होते.

नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनीताई गरवारे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. शाळेसाठी भरघोस केलेल्या मदतीबद्दल डॉ.सतीश गवळी, ॲड.संदीप अगरवाल, श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी आपल्या मनोगता मधून स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्टचे आणि कुकरेजा कुटुंबीयांच आभार मानले.

याप्रसंगी मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांनी चंदा चमके, पडेंगे लिखेंगे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावरती नृत्य सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश पाटील यांनी केले तर आभार सौ.मंजुषा महापुरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्री.धनंजय काळे यांच्या पसायदानाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here