उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर मोठी कारवाई : कोट्यावधीचा गुटखा जप्त

कोट्यावधीचा गुटखा जप्त

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शिरवळ : स्थानिक पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात होती. 



शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि एक चारचाकी वाहन (किंमत ४.५० लाख रुपये) देखील जप्त करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईदरम्यान चार व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.



पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, भगत, पावरा, पोलीस अंमलदार सचिन वीर, तुषार कुंभार, भाऊसाहेब दिघे, अरविंद बाऱ्हाळे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, तुषार अभंग, दीपक पालेपवाड, आणि अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here