बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांची पंढरपूर नगरीस भेट

मुख्य संपादक सुनील पाटील

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : पोलिस आणि नागरिकांतील दुवा म्हणून सातत्याने कार्यरत असणा-या बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांनी पंढरपूर नगरीस भेट दिली.

 

 

मुख्य संपादक सुनील पाटीलपंढरपूर पावन नगरीत त्यांचे आगमन झाल्यानंतर पंढरपूर रेस्ट हाऊस येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठलरुक्माईच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

 

 

यावेळी बुलंद पोलीस टाईम्सचे उपसंपादक ओंकार बसवंत, सोलापूर जिल्ह्याचे रिपोर्टर राहुल मस्के, पंढरपूर तालुका प्रतिनिधी शांतिनाथ इंगोले, तसेच माळशिरस तालुका प्रतिनिधी अमोल माने आदी उपस्थित होते. मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील बुलंद पोलीस टाइम्सच्या कामाचा आढावा घेऊन पुढील नियोजनाविषयी सर्वांशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here