मुंबई (उपसंपादक चंद्रशेखर आठल्ये) : शनिवार (दि.८) रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे संभाजी मैदान,मुलुंड ईस्ट मुंबई या ठिकाणी मुलुंड क्रिकेटर्स तर्फे आयोजन करण्यात आले.
सदरहू स्पर्धेचे उद्घाटन शाखा क्रमांक १०६ मुलुंड पूर्व शिवसेना उबठा शाखा प्रमुख अमोल संसारे तसेच आधारवड प्रतिष्ठान मुलुंड मुंबईचे अनिश शेंडगे यांच्या हस्ते झाले.
सदरहू स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री समीर वैती,प्रशांत परते, संजीव केणी, मिलिंद आमले,श्री बापट, महेश सावंत तसेच इतर कार्यकर्ते याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, अशा स्पर्धा भरवून नव्या पिढीसाठी मैदानी गेम खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे हा एकप्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.







