पाचोरा भडगाव रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

बर्निंग कार

भडगाव (तालुका प्रतिनिधी मनिष सोनावणे) : रविवारी (दि. ९) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा भडगावच्या बांबरुडजवळ तितर नदीच्या पुलावर एका चार चाकी वाहनांने अचानक पेट घेतला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांबरुडजवळ तितर नदीच्या पुलावर एका चार चाकी वाहन (क्रमांक एमएच १९ सीएफ ४६११) या वाहनाने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती कळताच पाचोरा भडगाव अग्निशमन दलाने ताबडतोब येऊन आग विझवण्याचं प्रयत्न केला.

 

अग्निशमन दलाने आगीशी दहा ते पंधरा मिनिटे झुंज देऊन आग विझवण्यात यश मिळवले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. बर्निंग कारचे थरारक चित्र पाहून ये जा करण्याऱ्या वाहने खोळंबली होती. आगीचा भडका मोठा असल्याने, दूरदूरपर्यंत धुरच धूर पसरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here