एसटी प्रवासात महिलेकडील ३ लाखांची रोकड चोरली

crime
File Photo

अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : अहिल्यानगर ते वाकडेवाडी एसटी बस प्रवासात महिलेकडील ३ लाखांची रोकड अज्ञाताने चोरून नेली आहे. त्यांच्या पर्समधून ही रोकड चोरण्यात आली आहे.

 

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. तक्रारदार या अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील आहेत. त्या काही कामानिमित्त पुण्याकडे येत होत्या. सकाळी साडे नऊच्या सुमारास त्या अहिल्यानगर येथून पुणे वाकडेवाडी बसस्थानक या बसमध्ये बसल्या होत्या.

 

दुपारी साडे बाराच्या सुमारास त्या वाकडेवाडी बसस्थानकात उतरल्या. दरम्यान, त्यांच्याकडील पर्समध्ये त्यांनी ३ लाखांची रोकड ठेवली होती. अज्ञाताने त्यांच्या पर्समधून ही रोकड चोरली. बसमधून उतरल्यानंतर त्यांना पैसे चोरीला गेल्याची लक्षात आले. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here