पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ : कोथरूड व वानवडीत बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज लंपास

घरफोडी
File Photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चोरट्यांनी कोथरूड व वानवडीत बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. पोलिसांना मात्र, अद्याप या चोरट्यांचा थांगपत्ता लागेला नाही.

 

 

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ५० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार परांजपे शाळेजवळील एका सोसायटीत राहतात. दरम्यान, ६ ते १८ फेब्रुवारीच्या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या घरातील बेडरूममध्ये घुसून दिवाणमध्ये ठेवलेले ४ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

दुसरी घटना वानवडी परिसरात घडली असून, याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार एआयसीटीएस येथील मॅरिड वसाहतीत राहतात. घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा अज्ञाताने घराचा कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधून कपाटात ठेवलेले ३ लाख ६४ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here