जिल्हा बँक लुटणाऱ्या व्हाइट कॉलर पुढांऱ्यावर कारवाई करावी – कुबेर जाधव

जिल्हा बँक

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : सर्वसामान्य कर्जदार शेतकऱ्यांना वेठीस धरण्यापेक्षा जिल्हा बँकेतून मोठी कर्ज घेणाऱ्या बड्या कर्जदार, आजी आणि माजी संचालकांच्या थकित रक्कम वसूल करण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 

५/५, १० /१० एकर क्षेत्रावर ५० लाखांपासून ५/५, १०/१० कोटीं पर्यंत कर्ज, त्याच त्याच मालमत्तेवर उचलून अल्पमुदत, दिर्घमुदत, फार्महाऊस, पोल्ट्री, अलिशान गाड्या साठी राजसत्तेचा गैरवापर करून कोट्यावधींची रक्कम उचलली, त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते, जिल्हा बँके प्रशासनाने अशा हेव्ही वेट व्हाइट कॉलर पुढाऱ्यावर धडक कारवाई केली जावी, जे कोणी बाबा, अण्णा, दादा, नाना, आप्पा असतील या सर्वावर कोणाचीही भिडभाढ न ठेवता सुमोटो कारवाई करून दोषींवर आर्थिक गुन्हे दाखल करण्यात यावे.

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पाच पाच वकीलांची फौज उभे करणारे बाबा, पाटील, आका कोण आहेत ? हे गोरगरीब शेतकऱ्यांना व ठेविदारांना एकदा समजू द्या. म्हणजे यांचे मुखवटे आपोआप सर्व सामान्य जनतेसमोर येतील, अशा आशयाचे निवेदन खा. किरीट सोमय्या, खा.राजु शेट्टी यांना थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीने पाठवण्यात आले असल्याचे, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिकचे समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here