राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

जळगांव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राजेंद्र महाजन) : आज (दि.१०) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांवच्या वतीने जिल्हा कार्यालयामध्ये ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिल्हासरचिटणी वाय एस महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

 

सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महिलांसाठी पहिली शाळा काढून महिलांना शिक्षणाची गोडी निर्माण करुन शिक्षणाचा पाया रुजवला. प्रथम शिक्षिका ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आले.

यावेळी अशोक लाडवंजारी (माजी जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , रमेशजी बारे (महानगर अघ्यक्ष.. राष्ट्रवादी समाजिक न्याय) , भाऊराव इंगळे , (उपाध्यक्ष .. राष्ट्रवादी समाजिक न्याय महानगर) , राजुभाऊ मोरे , (महानगर संघटक.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , सुनिलभैय्या माळी , (सरचिटणीस.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , रहिमभाऊ तडवी , (सरचिटणीस .. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार महानगर जळगांव) , आकाश हिवाळे (सरचिटणीस.. राष्ट्रवादी युवक महानगर जळगांव) , सतिश चौव्हाण (कार्यालय मंत्री.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार) इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here