व्ही.पी.एस.मध्ये महा विज्ञान मेळाव्याचे आयोजन

महा विज्ञान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉ.सी.व्ही रमण जयंती विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी आपल्या शुभहस्ते केले. प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते.

 

 

प्रशालेने आयोजित केलेल्या विज्ञान मेळाव्यासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रशालेतील छोट्या शास्त्रज्ञांनी प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेते. शेकडो प्रयोग प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रयोग टाकाऊ वस्तु पासून तयार करण्यात आलेले होते. आपल्या बुद्धीला पैलवतील असे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केलेली होती.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगांना पाहण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली. प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान विभाग प्रमुख श्री.सुभाष क्षीरसागर यांनी केले. विद्यार्थ्यांकडून प्रकल्प तयार करून घेण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री.दत्तात्रय सुरवसे, श्रीमती शुभांगी कडू, श्री.देविदास खेडकर, श्रीमती किरण मस्के, श्री.श्रीकांत म्हसकर, श्रीमती सुनिता बनकर, श्रीमती सई सर्जेराव, श्री.रवींद्र गोसावी, श्री.जयवंत सिसोदे आणि श्रीमती शिवानी बागलाने त्यांच्या सहकार्याने केले. प्रदर्शनाचे पर्यवेक्षण श्री.विठ्ठल खेडकर आणि श्री.देविदास खेडकर यांनी केले. प्रयोग शाळा सहाय्यक श्री.गणेश घारे यांनी प्रदर्शनाला मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here