मराठी कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सिनेसृष्टी असोसिएशनचा मोर्चा

मोर्चा

मुंबई (उपसंपादक सुरेश पटनाईक) : मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये हजारो ज्युनिअर आर्टिस्ट चित्रपट मालिका कलाकार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत दिनांक ११ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान येथे सकाळी नऊ वाजल्यापासून सिनेसृष्टी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सकपाळ आणि कमिटी वरील सभासद व पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

गेली कित्येक वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका मध्ये काम करणारे पुरुष महिला कलाकार यांना वेळेवर पेमेंट दिले जात नाही सेटवर त्यांना राहायची आणि खाण्याची व्यवस्था बरोबर होत नाही. अत्यंत घाणेरडी वागणूक दिली जाते. याबाबत गेली पाच वर्षे सातत्याने सरकारकडे कामगार मंत्री कामगार आयुक्त फिल्म सिटी मधील व्यवस्थापक संचालक पोलीस आयुक्त सर्वांना याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत. सिनेसृष्टी असोसिएशन गेल्या पाच वर्षांपासून या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु कोणत्याच प्रकारे याबाबतचे कामगार विभाग आणि शासनाकडून दखल घेतली जात नाही.

याबाबत मराठी महिला पुरुष कलाकार यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिनेसृष्टी असोसिएशनचे सभासद आझाद मैदान येथे मोर्चाने पोहचून उपोषणासाठी बसणार आहेत, असे अध्यक्ष श्री.सकपाळ यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here