ठाणे येथे बुलंद पोलीस टाइम्स मुख्यसंपादक सुनिल पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त अभीष्टचिंतन विशेष सोहळा उत्साहात

बुलंद पोलीस टाइम्स

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : महाराष्ट्रासह सहा राज्यात नागरिक आणि पोलिसांतील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांचा जन्मदिवसानिमित्त अभीष्टचिंतन विशेष सोहळा ठाण्यातील डॉ. बिनू वर्गिस यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमाला पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र आणि पोलिस प्रशासनाशी निगडित क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मुख्य संपादक सुनिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करत, निर्भीड आणि सत्यशोधक पत्रकारितेतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

 

कार्यक्रमाचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात डॉ. बिनू वर्गिस यांनी सुनिल पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या आजवरच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची महती सांगितली. त्यांनी पत्रकारितेतील सत्य आणि निर्भीडतेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. तसेच अन्य मान्यवरांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला. समाजातील विविध मुद्दे उजेडात आणण्यासाठी आणि निर्भीडपणे आवाज उठवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

संपूर्ण स्नेहभाव आणि आदराने भरलेला सोहळा
कार्यक्रमादरम्यान, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि सुनिल पाटील यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड आणि निडर वृत्तीने कार्य करणाऱ्या सुनिल पाटील सरांचा हा वाढदिवस केवळ एक सोहळा नसून, त्यांचे कार्य आणि समाजात त्यांनी निर्माण केलेली जागरूकता याची जाणीव करून देणारा क्षण ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here