ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला. यात दोन्ही गटाकडून एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला होता. या राड्यात दोन गटातील चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची घटना उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत झाला.
उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील साईनाथ कॉलनी राहत असलेल्या दोन गटातील नागरिकांमध्ये रविवारी रात्री वाद उद्भवला होता. यामुळे दोन गटात तुफान रक्तरंजित असा राडा झाला. या वादातून दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने हल्ले चढवल्याने यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. साईनाथ कॉलनीतील आफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्यात जुन्या भांडणाचे वाद आहेत.
दरम्यान जुन्या भांडणातून रविवारी रात्री आफताब शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा हे साथीदारांसह समोरासमोर आले. यानंतर त्यांनी थेट तलवार व चाकूने एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये आफताब शेख, योगेश उर्फ बबड्या, धीरज विठ्ठले आणि इकबाल शेख हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या राड्याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हिललाईन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.







