नूतन मराठा महाविद्यालयातर्फे मुख्य संपादक सुनिल पाटील यांचा सत्कार

सुनिल पाटील

जळगाव (उपसंपादक नंदूअप्पा पाटील) : पोलीस व नागरिकातील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सने केवळ गुन्हेवार्ता न देता विविधांगी वृत्तांकन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्यांमध्येही बातम्या प्रकाशित करण्यात येतात. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित केल्याबद्दल नूतन मराठा महाविद्यालयातर्फे बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

नूतन मराठा महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांच्या बातम्यांनाही वेबपोर्टल व साप्ताहिकात स्थान देवून लोकांपर्यंत महाविद्यालयाचे उपक्रम पोहचवल्याबद्दल आभार मानत नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी सुनिल पाटील यांचा सत्कार केला.

प्राचार्यांच्या दालनातील या सत्कारप्रसंगी नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.बी.पाटील, सायन्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रा.आर.बी.देशमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here