ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : उल्हासनगरमध्ये धुळवड साजरी करून परतणाऱ्या तरूणीचा काही टवाळखोरांनी भर रस्त्यात विनयभंग करण्यात केला आहे. नंतर मारहाण देखील झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक १मधील फक्कड मंडली ते झूलेलाल मंदिर परिसरात एका तरूणीबरोबर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. धुळवड साजरी करून तरूणी आपल्या घरी जात होती. यादरम्यान, काही टवाळखोरांनी तिला अडवलं. तरूणीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केला.
तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार शुक्रवारी घडला. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यावेळी मारहाण देखील झाली. मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही तपासले.यापकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भावेश होटचंदानी,रोहित जग्याशी यांच्यासह अन्य काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







