अलिबाग-सोगावकर – दिनांक २२ऑगस्ट पासून गौरी-गणपतीच्या सणाला सुरुवात होत आहे,अनलॉक डाऊन ची प्रक्रिया काही ठिकाणी सुरु असून सुद्धा सार्वजनिक वाहतूक संस्था खास करून एसटी सेवा अंशतः सुरू आहे,त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे.
या अनुषंगाने सुरक्षित अशा परदेशी बनावटीची रो पॅक्स सेवा बोटीची जलवाहतूक सेवा न्यू वार्फ ते मांडवा मार्गावर सुरू करावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासन व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डा चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामास्वामी एन.यांना लेखी पत्राद्वारे केली होती.
ही मागणी विचारात घेऊन दिनांक २० ऑगस्ट पासून रो पॅक्स सेवा प्रत्यक्षात येणार आहे, त्यामुळे मुंबई-अलिबाग, मुरुड व रायगड जिल्ह्यातील प्रवासी वर्गाची चांगली सोय होणार आहे, याबद्दल ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासन व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डास धन्यवाद देण्यात आले आहे.
याजबरोबर काल दिनांक १७ ऑगस्ट पासून रेवस-करंजा तर सेवेला एसटी ची संलग्न सेवा सुरू केली आहे,सर्व सामान्य व समाजातील सर्व थरांतील प्रवाशांची अलिबाग, मुरुडहुन उरण,नवी मुंबई,ठाणे,मुंबई येथे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची सोय होणार आहे. याबद्दल रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व एसटीच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानणारे पत्रक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.







