जिल्ह्यात आढळले आज ४९८ कोरोनाबाधित

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर आज (दि.१८) जळगाव जिल्ह्यात 498 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९ हजार ८२ झाली आहे. सर्वाधिक ८२ कोरोबाधित हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत तर दिवसभरात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या ४९८ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ४९, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १७, अमळनेर ८२, चोपडा ४४, पाचोरा १५, भडगाव ५३, धरणगाव २६, यावल ९, एरंडोल ४०, जामनेर १७, रावेर १७, पारोळा ३२, चाळीसगाव ७५, इतर जिल्ह्यातील ६ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर आणि पाचोरा शहरातील प्रत्येकी २ तर जामनेर, रावेर व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी १ याप्रमाणे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here