कांगटाणी परिवाराच्या दातृत्वानं महापालिका गॅस दाहिनीची सिलेंडर खरेदी

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण टाळण्यासाठी काही नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यानं पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहीणी सुरू झाली. या दाहीणीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठया प्रमाणात गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. याबाबत कोल्हापूरातील प्रतिमानगर इथल्या कांगटानी परिवारांन पुढाकार घेत दातृत्वाचं दर्शन घडविलं. महापालीकेचे सहाय्यक आयुक्त नितीन देसाई यांच्याकड कांगाटानी परिवाराच्यावतीन आज ३० हजार रुपयांचा धनादेश सूपूर्द करण्यात आला.
कोल्हापूरची आठवण सातत्यान राहावी या उद्देशान बडोदा इथल्या राजेंद्र चव्हाण या उद्योजकान लाखो रुपये खर्चून कोल्हापुरात गॅस दाहीणी उभारली. मात्र गेल्या २ वर्षापासून गॅस दाहीणी सुरू करण्यात महापालीका प्रशासनाला यश आलं नव्हत. नगरसेवक ईश्‍वर परमार यांच्या पुढाकारानं आणि त्यांच्या खर्चातून गॅस दाहीणीचं उर्वरित काम पूर्ण झालं. त्यामुळ कोरोना संसर्गाच्या काळात ही गॅस दाहीणी सुरू करण्यात यश आल. गॅस दाहीणी सुरू झाल्यानंतर मृतांदेहांवर तात्काळ अंत्यसंस्कार करंण सुलभ झालंय. मात्र यासाठी आवश्यक असणाऱ्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतोय. तो दूर करण्याच्या उद्देशानं कोल्हापूरातील प्रतिभानगर इथल्या कांगटानी परिवारान पुढाकार घेतलाय. सिलेंडरपोटी त्यांनी आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकड ३० हजार २८८ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या निधीतून २६ सिलेंडर प्राप्त होणार आहेत. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, प्रकाश कांगटानी, प्रविण कांगटानी, राकेश कांगटानी, मनिलाल कांगटानी, योगेश कांगटानी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here