पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : परकीय आक्रमक बाबरचा वंशज असणारा व क्रूर शासक औरंगझेब याची कबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे. ही कबर हटविण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बजरंग दल प्रखंड तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, औरंगझेबाचा मृत्यू अहिल्यानगरात झाला, नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली. याच औरंगझेबाने शीख गुरु तेगबहादूर यांची क्रीर हत्या केली होती. शीख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बालकांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून भिंतीत जिवंद चिणून मारले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर व यातनामय हत्या केली. श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर फोडले. मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिराचा विध्वंसही यानेच केला. सोरटी सोमनाथाचे मंदीर यानेच फोडले. जेजुरी गड, त्र्यंबकेश्वर मंदिरावरही हल्ले केले. हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक कत्तक केली. छत्रपती शाहू महाराजांचे अेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले.
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, अशा क्रूरकर्मा व आततायी औरंगझेबाचे स्मारक किंवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे व अनंत यातनांचे प्रतीक आहे. तरी ही कबर पूर्णपणे नष्ट करावी. परकीय आक्रमकांचे कुठलेही नामोनिशाण ठेवू नये. कबर नष्ट न केल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हिंदू समाजाला बरोबर धेऊन छत्रपती संभाजी नगरकडे कारसेवेसाठी कूच करुन, औरंगझेबाची कबर नष्ट करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.







