मोफत शस्त्रक्रिया शिबिरासाठी, खटाव RBSK चे २७ लाभार्थी कराडला; जिल्हा रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम

मोफत शस्त्रक्रिया
वडूज येथे मोफत शस्त्रक्रिया शिबिरासाठी सहभागी बालके , त्यांचे पालक व उपस्थित टीम

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) ता. खटाव, अंतर्गत 27 विद्यार्थ्यांना सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, वडूज येथून पाठवण्यात आले. यामध्ये जननेंद्रिय विकाराचे 10, अस्थिव्यंग 3, टॉन्सिल्स 6, टंग टाय 4, अंगावर गाठी असणे 4 अश्या एकूण 27 विद्यार्थी व बालके यांचा समावेश आहे.

 

तालुक्यात 0 ते 18 वयोगटातील बालके व विद्यार्थी यांची तपासणी RBSK अंतर्गत करण्यात येते. यामधील संदर्भित विद्यार्थी यांना जिल्हा रुग्णालयाच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मोफत संदर्भ सेवा दिल्या जातात, त्याचाच एक भाग म्हणून हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. लाभार्थी विद्यार्थी व बालके यांना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ने-आण करणेसाठी दर्जेदार बस ची उपलब्धता काण्यात आलेली होती. सहकार्यासाठी RBSK स्टाफ ही उपस्थित होता.

विविध मोफत शिबिरे, सायन हॉस्पिटल, मुंबई यांचे वडूज येथील शिबिर, ग्रामीण रुग्णालय, वडूज येथे झालेल्या शस्त्रक्रिया, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, सातारा येथे झालेल्या शस्त्रक्रिया, यांच्या मदतीने शस्त्रक्रियांच्या बाबतीत खटाव तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानी आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी रहावा ह्यासाठी जिल्हा पातळीवरून RBSK चा सर्व स्टाफ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व सर्व जिल्हा प्रशासन यांचे विशेष प्रयत्न सुरू असून पालक वर्गातून ह्या उपक्रमामुळे समाधान व्यक्त होत आहे.

सदरच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल, कराड ची पूर्ण टीम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, वडूज चे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी तसेच मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. सुभाष कदम, वैद्यकीय अधीक्षक ग्रा. रु. वडूज डॉ. लीला मदने, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षिका श्रीम. असिया पट्टणकुडे, गटशिक्षणाधिकारी सौ. विभुते मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीम. पाटोळे व ओमासे मॅडम तसेच तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here