सटाणा बाजार समिती, निवडणूक की, बिनविरोध ?

सटाणा बाजार समिती

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : तोट्यात असलेल्या बाजार समितीत निवडुण येण्यासाठी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांकडून कोट्यावधी रुपयांचा चुराडा निश्चित आहे, सर्व वरीष्ट नेते,आजी माजी लोकप्रतिनिधी, , शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते यांनी एकत्र येऊन सर्व संमतीने संचालक मंडळ निश्चित करण्यात यावे, अशी बागलाणकर शेतकऱ्यांची भावना आहे.

 

कधी काळी प्रचंड नफ्यात चालणारी व नावारूपाला आलेली सटाणा बाजार समिती सद्या सरकारी अनुदानावर कशी बशी तग धरून आहे,कामगार आणि कर्मचाऱ्यांच् वेतन वेळेवर होइलच याची शाश्वती राहीलेली नाही,हमाल मापाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे,या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांनी, तसेच सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत एकत्र येऊन बैठक आयोजित करावी, शेतकऱ्यांसाठी झटणारे, कांद्याच्या हमी भावासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याऱ्यांनाही सत्तेत संधी मिळाली पाहिजे, प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व संमतीने सर्व समावेशक संचालक मंडळ निश्चित केले जावे अशी बागलाण करांची अपेक्षा आहे,गेली ५० वर्ष दिमाखात उभी असलेली बाजार समिती गेल्या काही वर्षापासून राजकीय अडा् म्हणून चर्चेत आहे, गेल्या दहा, बारा वर्षात, कधी निवडणूक तर कधी बिनविरोध,तर कधी प्रशासक तेही पणन मंत्र्यांकडे वजन वापरून खुशहाली बहाल करुन आपल्याच बगलबच्यांची सोय प्रशाशाशकीय मंडळावर लावली जात होती.

सात वर्षांपूर्वी चुरशीची झालेली बाजार समितीची निवडणूक ही थेट सातबारा धारक शेतकऱ्यांमधून गण रचनेतून झाली होती, तत्कालीन पणन राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत यांनी तसा फतवाच काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला होता,त्या द्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेच स्वागतच शेतकऱ्यां कडून झाले होते,परंतु वर्ष सहा महिन्यांतच सरकार बदलले आणि सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारने पुन्हा परम्पंरागत पद्धतीने सोसायटी आणि पंचायत गटातुन निवडुन आलेल्या सदस्यांमधुन निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना माननारा मोठा गट तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहे, भारतीय जनता पक्षाचे सरळ सरळ दोन गट या बाजार समितीच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे, तिसरा महत्त्वाचा घटक असलेल्या माजी आमदार संजय चव्हाण, आणि शिवसेना,क्रांग्रेस, राष्ट्रवादीचा गट व इतर संघटनांचे छोटे मोठे कार्यकर्ते यांची आघाडी स्थापन होऊन पर्यायी पॅनल सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै,, प्रविण दादा सारखे हेव्हीवेट नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चुरस बघावयास मिळाली होती, त्यामुळे प्रविण दादांच्या पत्नी मंगल ताइ सोनवणे यांना प्रथम सभापती म्हणून बिनविरोध संधी प्राप्त झाली होती, आवर्तनं पद्धतीने सर्वच इच्छकांना खुर्ची वर बसण्याची संधी मिळत गेली, त्यामुळे मागिल संचालक मंडळातील सदशांनी माघार घेऊन नव्यांना संधी द्यावी असा मतप्रवाह ऐकावयास मिळत आहे, माघारीसाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत, निवडणूक बिनविरोध होण्याची ज्यास्व शक्यता वर्तवली जात आहे,बघु काय होतंय ते,घोडा मैदान जवळच आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here