नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : कालच्या पेपर मधे एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी खंडणी प्रकरणी पकडला गेला आणि सगळीकडे खळबळ मजली.वास्तविक हे सर्सास सर्व पक्षीय धोरण झाले.गुंड पाळा वेळेवर वापर करा. बीड प्रकरणातून हे प्रकर्षाने जाणवते.गेली कित्येक वर्ष आका आणि बोका परस्पर हिता साठी काम करत आहे.
पेपर मधून किंवा विधानसभेतून बीड मध्ये किती खूण झाले याची आकडेवारी जाहीर झल्यापासून सामान्य जनता भयभीत होत आहे.आणि काय दिवस आले.पूर्वी चे दिवस किती चांगले होते.नैतिकता आणि शब्दाला मांन होता.परंतु आता सर्व पैशाचा खेळ सुरू आहे.
राजरोस क्रिमिनल पक्षाच्य वरिष्ठ पदावर असतात.त्यांची पिलावळ प्रत्यक्ष फिल्डवर कार्य रत आहे.काही झाले आपला बाप बसला आहे अशी फुशारकी मारली जाते.त्यामुळे भीती किंवा कायद्याचा धाक दिसत नाही. एक गुन्हा झाला तो पाचला की पुढे तो सराईत होतो आणि आपले कऱ्य जोमाने चालवतो.
वास्तविक भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत अनभिषिक्त सत्ता आहे.निदान त्यांनी तरी आता यावर विचार करावा.आपले कार्यकर्ते कोण आहेत ते काय काम करतात.त्यांचे सामजिक आयूष्य कसे आहे हे सर्व माहिती ठेवणे गरजेचे आहे.
वास्तविक सर्वसामान्य जनता आणि मतदार यांनी भारतीय जनता पक्षाला भरपूर मतदान करून सत्तेवर बसवले.कमीत कमी बीजेपी तरी अशा गुंडांची दावन पदरी ठेवायला नको.कारण सामान्य जनता पक्षाबरोबर आहे. आता त्यामुळे बी जे पी ने या विषयावर आत्मपरीक्षण करावे.सर्व अका बोका बाजूला करावे. नवीन पदाधिकारी नेमताना त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे .आणि तपासून मगच पदाधिकारी नेमणूक करावी म्हणजे आपोआप सगळी मेसेज जाईल आणि अका बोका बाजूला जातील.
सुरवाीपासूनच “पार्टी विथ डिफरन्ट ” बी जे पी या पक्षाची पालिसी आहे.त्यांनी पुढाकार घ्यावा.आणी देशातील राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे.तुम्ही सुरुवात करा जनता निश्चितच पक्षाबरोबर राहील याची खात्री आहे.कारन या देशातील जनता पण कंटाळलेली आहे.त्यांना पण बदल हवा आहे…पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना अभिप्रेत पक्षाची प्रतिमा निर्माण करा आणि पुनर्निर्माण करावी ही अपेक्षा आहे.आणी हाच योग्य काळ आहे. नाहीतर आका बोका बोकाळतील आणि मग तुमच्या कंट्रोल मधे काही राहणार नाही…बघा पक्षातील नेत्यांनी यावर विचार करावा.वरिष्ठापर्यत माहिती पाठवा आणि बदल करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिकचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.







