होळीच्या बहाण्याने विद्यार्थींनींवर हल्ला; विद्यार्थींनी गंभीर जखमी

विद्यार्थींनींवर हल्ला

गडग (कर्नाटक) (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यात एका गावात शुक्रवारी झालेल्या होळी दिवशी ही घटना घडली. यामध्ये चार पाच दुचाकीस्वारांनी शाळेतील विद्यार्थींनीचा पाठलाग करत त्यांच्यावर रासायनिक रंग फेकले. यामुळे विद्यार्थींनी गंभीर जखमी झाल्या आहेत. आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

सरकारी शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या काही विद्यार्थींनी परीक्षा देण्यासाटी जात होत्या. लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुवर्णगिरी बस स्टॉपवर त्या बसची वाट पाहत होत्या. बसमध्ये चढताच काही तरुणांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

टवाळखोर मुलांनी त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यार्थींनी घाबरल्या होत्या. त्यांनी लगेचच आलेल्या बसमध्ये प्रवेश केला. मात्र तरी देखील टवाळखोर मुले त्रास देण्याची थांबली नाहीत. विद्यार्थींनी बसच्या खिडक्या बंद केल्यानंतर त्यांनी रसायने टाकण्यास सुरुवात केली. बसमध्ये चढल्यावर रसायने मिसळेलेले रंग त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. प्राथमिक तपासानुसार, विषारी द्रवात शेण, अंडी, फिनाइल आणि रंग होते. यामुळे विद्यार्थींनीना श्वास घेण्यास त्रास होत असून छातीत दुखणे आणि इतर लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तीन विद्यार्थींनीची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here