वुमेन्स अॅन्ड चॉईल्ड केअर प्लसतर्फे कष्टकरी महिलांसाठी महिला दिन

कष्टकरी महिलांसाठी महिला दिन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : येथील वुमेन्स अॅन्ड चॉईल्ड केअर प्लस या संस्थेतर्फे कष्टकरी महिलांसाठी १२ व १३ मार्च असे दोन दिवसीय असे महिला दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी कष्टकरी महिलांचे खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. यात सुमारे ७०-७५ महिलांनी भाग घेतला. दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ५ महिलांचा मोमॅटो, बुके आणि भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला, तसेच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. विशाखा गर्ने, सिमाताई भोळे, सहाय्यक कामगार आयुक्त राजु गुल्हाने, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शांता वाणी यांनी प्रास्ताविकास संस्थेच्या कार्याची माहिती देवून कष्टकरी महिला व त्यांच्या पाल्यांसाठी आम्ही १० वर्षा पासून त्यांच्या रहिवास क्षेत्रात जावून काम करीत असल्याचे नमुद केले. डॉ. विशाखा गर्ने यांनी महिलांनी त्यांचे आरोग्य स्वच्छता आणि योग्य आहार खाण्यापिण्या कडे लक्ष द्यावे तसेच आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

राजु गुरहाने यांनी कष्टकरी महिला व पुरुषांसाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली आणि आपण या संस्थेमार्फत या योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले. मिमाताई भोळे आणि विजयसिंह परदेशी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे २०० कष्टकरी महिला आणि संस्थेच्या सुमारे ६५ कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शेवटी उपाध्यक्षा रुपाली पवार यांनी आभार प्रदर्शन केले तर सुत्र संचालन कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव छाया पाटील, शालिनी चौधरी, समता भावसार, तनुजा चोपडे, पुजा पंडीत, शालिनी पाटील, नंदा पाटील, अर्चना पाटे, ज्योती दालेराव, डॉ. ममता बुच्चा, वंदना पांडे, साक्षी सुर्यवंशी, निवेदिता ताटे, शिल्पा रावेरकर आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास सिमाताई भोळे, नानजीभाई खिमजीभाई उक्कर (ठाणावाला), बेगा केमिकल्स प्रा. लि. यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here