मुंबई (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी आयोजित तमाशा सम्राट काळू-बाळू यांना समर्पित लोकनाट्य तमाशा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून ही कार्यशाळा २० मार्च ते ३० मार्च दरम्यान लोककला अकादमीच्या मुख्य सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या शुभहस्ते पार पडले. दरम्यान लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे, सुप्रसिद्ध ढोलकी वादक कृष्णा मुसळे आणि प्रा. डॉ. मोनिका ठक्कर उपस्थित होते. प्रसंगी योगेश यांनी कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीसोबत परिसंवाद केला. उपस्थितांना त्यांच्या अनुभवाचे दर्शन घडवून देत आपल्या स्ट्रगलिंग आयुष्य उलगडले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना रजतपटावरील आणि लोकरंगभूमीवरील साम्यभेद समजण्यास मदत झाली.
या कार्यशाळेत पुढे विविध मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणार्थ्यांना लोकनाट्य तमाशा शिकायला मिळणार आहे. असं या कार्यशाळेचे संचालक आणि लोककला अकादमी विभागप्रमुख डॉ गणेश चंदनशिवे यांनी आश्वासित केले.






