मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर पती अन् साथीदारांचा पत्नीवर सामूहिक बलात्कार

gangrape
File Photo

जोगेंद्रनगर (त्रिपुरा) : पतीने मित्रांसोबत दारू पार्टी केली. नंतर दारूच्या नशेत त्याने त्याच्या मित्रांसोबत पत्नीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली आहे. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

 

सुब्रत आपल्या पत्नीसोबत जोगेंद्रनगर येथे आपल्या सासरी राहत होता. त्याची पत्नीला ७५ टक्के बौद्धिक अपंगत्व आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला सुब्रतने त्याच्या मित्रांसोबत चौमुखानी बाजार परिसरात दारू पार्टीचे आयोजन केले होते. तो मित्रांसोबत दारू प्यायला बसला.

दारूच्या नशेत सुब्रत आणि त्याचे मित्र त्याच्या सासरच्या घरी गेले होते. नंतर सुब्रत आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडित महिलेच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी १४ मार्चला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

यासंदर्भात पोलीस अधिकारी मृणाल पॉल म्हणाले की, या प्रकरणी सध्या पोलिसांनी कारवाई करत सुब्रत डे याला अटक केली आहे. तर, इतर पाच आरोपी फरार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी पीडितेचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सध्या आरोपी अटकेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here