नाशिकला बस स्थानकावर तरुणाने केला स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

crime
file photo

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. एका तरुणाने ठक्कर बाजार बस स्थानकावर स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी शुभम जगताप याला अटक केली आहे. पिडीत स्वच्छता कर्मचा-याचे नाव विजय गेहलोत आहे. या घटनेत विजय गेहलोत हे ६० टक्के भाजले आहेत. गेहलोत हे नाशिकच्या ठक्कर बस स्थानक परिसरात सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. आरोपी शुभमला दारुचे व्यसन आहे. तो अनेकदा दारु पिऊन बस स्थानक परिसरात यायचा. गेहलोत यांनी शुभमला ‘तू दारू पिऊन या परिसरात येऊ नको’, असे सांगितल्याचा राग आला.

या रागात त्याने थेट सुरक्षारक्षक असलेल्या गेहलोत यांना जीवे मारण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी तो एका बाटलीत पेट्रोल घेऊन बस स्थानकावर आला. त्यांनी अचानक हॅप्पी होली म्हणत गेहलोत यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि काही कळायच्या आत गेहलोत यांच्या अंगाला आग लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here