लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचारासह साडेपाच लाखांना घातला गंडा

rape
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : कारेगाव (ता.शिरूर) येथील महिलेची तिच्या व्यवसायातून सुरजकुमार सिंग याच्यासोबत ओळख झाली. यानंतर सुरजकुमार याने महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपी सुरजकुमार याने महिलेला विविध ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला. इतकेच नाहीतर पीडित महिलेकडे साडे पाच लाखांची मागणी करत गंडाही घातला.

 

आरोपी सुरजकुमार याने महिलेच्या घरी जात तसेच रांजणगाव गणपती व कारेगाव येथील हॉटेलवर घेऊन गेला. तसेच महिलेला लग्नाचे आमिषही दाखवले आणि जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, सुरजकुमार याने वेळोवेळी आर्थिक अडचण असल्याचे सांगून महिलेकडून पैसे घेत महिलेचे तब्बल पाच लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर महिलेशी लग्न करण्यास नकार देत महिलेकडून घेतलेले पैसे देखील देण्यास टाळाटाळ करू लागला.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडित महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुरजकुमार विजयराम सिंग (सध्या रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. रुपाव ता. नवादा जि. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here