ओडिशामध्ये ६५ वर्षीय आजीने २०० रुपयांना विकला नातू

crime
File Photo

मोराडा (ओडिशा) (वृत्तसंस्था) – येथील बलदिया गावात गरीबीला वैतागुन ६५ वर्षीय विधवा महिला मंद सोरेन यांनी त्यांच्या ७ वर्षांच्या नातवाला २०० रुपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, मंद सोरेन यांचे स्वतःचे घर नाही आणि जमीनही नाही. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तिचा मुलगा बेपत्ता आहे आणि तिची सून कोरोना व्हायरसमुळे मरण पावली. त्यांना सरकारी मदतही मिळत नाही.

 

वृद्ध महिला नातवासोबत तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. सोरेन भिक्षा मागून स्वतःचे आणि तिच्या नातवाचे पोट भरत होती, पण वृद्धापकाळ आणि शारीरिक दुर्बलतेमुळे तिला मुलाची काळजी घेणे कठीण झाले होते. त्यामुळे हताश होऊन वृद्ध महिलेने २०० रुपयांत आपल्या नातवाला विकले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पंचायत समिती सदस्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलाला वाचवले आणि पोळी ठाण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाल संरक्षण विभाग आणि रसगोविंदपूरचे सीडीपीओ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहोचले.

बाल संरक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आम्ही पोलिस स्टेशन गाठले आणि वृद्ध महिलेशी चर्चा केली. तेव्हा वृद्ध महिला म्हणाली की, मी मुलाला विकले नाही तर माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षणासाठी एका जोडप्याला दिले. दरम्यान, स्थानिक लोक सरकारकडे वृद्ध महिलेला पेन्शन आणि घरबांधणीची मदत देण्याची मागणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here