उल्हासनगरमध्ये तरुणांचा रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला

crime
file photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : आशेळे पाडा भागात शनिवारी सायंकाळी रिक्षा चालकावर तरुणांनी चॉपरने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

 

 

आशेळे पाडा गणपती मंदिर चौकात रिक्षा स्टॅण्ड असून याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होत असते. शनिवारी सायंकाळी एका दुचाकीवरून तरुण ट्रिपल सीट जात असताना वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी रिक्षा बाजूला घेण्यावरून रिक्षा चालक आणि या तरुणात वाद झाला.

त्यातून रिक्षा चालकाने यातील एका तरुणाच्या कानशिलात लगावली. त्यावर या टोळक्याने रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला चढवला. त्यामुळं रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी पळाला, मात्र पाठलाग करून या तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या रिक्षा चालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अरमान खान आणि करण मेहरा या दोघांना अटक केलीये. त्यांच्याकडून हल्ल्यात वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला असून विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here