नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह २५ माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेच्या नोटीसा आल्या आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे राजकीय नेते गोत्यात आले आहेत.
आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉक्टर राहुल आहेर, खासदार शोभा बच्छाव या नेत्यांना बँकेने नोटिसा दिल्या आहेत.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३४७ कोटींच्या कर्ज वाटपात १८२ कोटींची अनियमितता प्रकरणी बँकेने राजकीय नेत्यांना नोटिसा दिल्या आहेत. कलम 88 अंतर्गत अडीच वर्षाची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी १५ अधिकारीही अडचणीत येणार येतील, अशी शक्यता आहे. १८२ कोटींच्या वसुलीप्रकरणी ४४ जणांसमोर येत्या दोन एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
कुणाच्या नावे किती अनियमितता?
माणिकराव शिंदे ०.६७ कोटी
माणिकराव कोकाटे १.८७
नरेंद्र दराडे ८.८९
देवीदास पिंगळे ८.६५
दिलीप बनकर ८.६५
राजेंद्र भोसले ८.७८
राघो अहिरे ८.८९
सुचेता बच्छाव २.११
चंद्रकांत गोगड १.३२
दत्ता गायकवाड ०.६७
नानासाहेब पाटील ८.७८
राजेंद्र डोखळे ८.८९
संदीप गुळवे ७.५७
शोभा बच्छाव २.११
जे. पी. मावित ७.२१
माणिकराव बोरस्ते ७.०२
धनंजय पवार ७.५७
शिरीष कोतवाल १.९८
वैशाली कदम ८.५४
वसंत गिते १.८९
राहुल ढिकले ८.७६
गणपतराव पाटील ८.८९
डॉ. राहुल आहेर ०.४३







