अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी देवळा पोलिस उपनिरीक्षकांनी घेतली ग्रामस्थांची बैठक

देवळा पोलिस

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : काल (दि.२१) झालेल्या गोवंश तस्करी संदर्भात गाव आणि परीसरातील जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या, संबंधित संसयीत व्यक्तीना पंचायती मध्ये बोलवुन समजही देण्यात आली होती, देवळा पोलिसांनी त्यांना अनेक वेळा पोलिस ठाण्यात बोलावून गोतस्करी न करण्याबाबत समज देऊनही काल जो प्रकार केला त्याबद्दल विठेवाडी,लोहोणेर,सालकी परीसरातील तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

दोषींवर कारवाई केली जावी म्हणून दि २१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक घेऊन संबंधित गोवंश तस्करी करणाऱ्या इसमांवर वर कडक कारवाई करावी, वेळ पडल्यास भविष्यात अशा घटना घडु नयेत म्हणून हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचा ठराव शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने करण्यात आला, या सर्व परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवळा येथील पोलिस उपनिरीक्षक दिवस पाटील आणि त्यांच्या. सहकाऱ्यांनी तातडीने विठेवाडी गावाला भेट देऊन

आज दि,२२ रोजी सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच म्हणून शांततेत एकुण घेऊन संबंधित संशयीत इसमांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले, तसेच आपणही कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता,गाव आणि परीसरात शांततेचा भंग होनार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले, यावेळी शेकडो तरुण व नागरिक उपस्थित होते,विशेष बाब म्हणजे मागिल चार महिन्यांपूर्वीच गांव व परीसरात अवैध धंद्यांना आळा बसला म्हणून लाखो रुपये खर्चून एक डझन पेक्षा जास्त सि,सि,क्यामेरे बसवण्यात आले आहेत तरीसुद्धा रात्री बेरात्री अवैध तस्करी होतेच कशी ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here