हिंगोली बसमत येथे हळदी बेण्याच्या विक्रीचा शुभारंभ

हळदी बेण्याच्या विक्रीचा शुभारंभ

हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जि. हिंगोली येथे खरीप हंगाम 2024 मध्ये हळदीच्या विविध वानांची लागवड करण्यात आली होती. या हळद वाणापैकी जे वाण चांगले उत्पादन देत आहेत, अशा वाणांचे हळदीचे बेणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. व्यवस्थापकीय संचालक, राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या हळदीचे बेणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हेमंत पाटील यांनी संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक यांना सूचना देत केंद्रावरील जातिवंत, शुद्ध, निरोगी बेयणे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध होईल या दृष्टीने दर निश्चित करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत सर्व अधिकार दिले.

 

नियमक मंडळाच्या बैठकीत याबाबतीत चर्चा होऊन बेण्याचे अतिशय माफक दर जाहीर करण्यात आले. या भागातील सेलम व गतवर्षी चांगले उत्पन्न दिलेल्या फुले स्वरूपा या वाणाचे दर प्रति क्विंटल ४००० रु. याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच याच वाणाचा बंड्याचा दर ३०००/-रु. प्रति क्विंटल असा ठरवण्यात आला. काही प्रमाणात इतर वाणांचे बेणे उपलब्ध असल्यामुळे व जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन वाण उपलब्ध करून देण्याबाबत हळदीची जोमदार, शुद्ध व निरोगी रोपे निर्मिती करण्यासाठी सूचना दिल्या व त्या रोपांची किंमतही अतिशय माफक दरात हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत ना नफा या तत्वावर रोपे तयार करून देण्यासाठी सूचना दिल्या. नियामक मंडळाच्या सन्माननीय संचालक महोदयांनी याबाबतीत त्यांचे मत मांडत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे गुणवत्तापूर्ण बेणे माफक दरात उपलब्ध होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. या बेण्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व्हावी व त्या वाणांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी रोपांची शेतकऱ्यांमध्ये उपलब्धता करून दिल्यास त्यातून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर बेण्याची उपलब्धता होईल व वाणांची उत्पादकताही समजून येईल असे सांगितले.

सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जिथे पाण्याची कमी उपलब्धता आहे अशा शेतकरी बांधवांसाठी कमी कालावधीच्या हळदीचे बेण्याची उपलब्धता होऊन जास्तीत जास्त पावसाच्या पाण्यावर हे पिक कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करावेत, तसेच या हळदीचा कालावधी कमी करण्यासाठी रोपांपासून लागवड केल्यास साडेपाच ते सहा महिन्यातच हळद तयार होऊ शकते व सोयाबीन खालील काही भाग या पिकाखाली आणता येऊ शकतो असे सांगितले. अशा शेतकऱ्यांना रोपांची उपलब्धता तसेच दर्जेदार व शुद्ध रोपांसह शक्य असेल तेथे बेणे उपलब्ध करून देण्याबाबत ,शेतकऱ्यांना चांगली जातीवंत शुद्ध रोपे बेणे करून देण्याबाबत आश्वासित केले. मंडळाच्या बैठकीत बेणे विक्रीचे दर निश्चित केल्याप्रमाणे आज बेणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आज वसमत तालुक्यातील आंबा चोंडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री संजय मारोतराव भोसले यांनी आज जगप्रसिद्ध लॅकडोंग हळदीच्या बेण्याची खरेदी केली.

यावेळी याच शेतकऱ्यांच्या शुभहस्ते विक्रीचा शुभारंभ केला त्यांचा सत्कार संशोधन केंद्राच्या वतीने श्री रमाकांत भुरे यांनी केला. आपल्या भावना व्यक्त करताना संजय भोसले या युवा हळद उत्पादक शेतकऱ्यांने संशोधन केंद्राच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागातील शेतकऱ्यांना परराज्यातील व महाराष्ट्रापासून अति दूर असलेल्या मेघालय राज्यातील बियाणे अतिशय माफक दरात मिळवून दिल्याबाबत मा. ना. श्री हेमंत पाटील यांचे आभार मानले तसेच व्यवस्थापकीय संचालक व हळद संशोधन केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आभार मानले. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत नक्कीच चांगले दिवस येतील व हळद उत्पादनात सुवर्णकाळ येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्राच्या उभारणीसाठी त्यांनी करत असलेल्या प्रयत्नांसाठी यश मिळावे व हिंगोली सारख्या उद्योग व्यवसायात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यात एक चांगले सुसज्ज व सर्व सोयी सुविधासह राज्यासह जगातील सर्वात चांगले संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया, निर्यात या हळदीशी संबंधित सर्व घटकांनी परिपूर्ण असलेले केंद्र गतीने मार्गी लागत पुर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here