महिलांची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी – तृप्ती देसाई

महिलांची इच्छाशक्ती

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : प्रत्येक महिलेची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी, इच्छाशक्ती प्रबळ असल्यावर संपूर्ण जग जर तुमच्या विरोधात गेले तरी विजय तुमचाच असतो हे मी अनेक आंदोलनातून दाखवून दिले आहे.असे महिलांना उद्देशून भूमाता ब्रिगेड च्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त शबनम न्यूज मीडिया ग्रुप या वृत्त संस्थेच्या वतीने आदर्श नारी पुरस्कार 2025 हा पुरस्कार सोहळा रविवारी 16 मार्च रोजी चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात संपन्न झाला भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती ताई देसाई यांच्या शुभहस्ते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आदर्श नारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

 

तृप्ती देसाई यांनी पुढे सांगितले. कि अनेक कर्तुत्वान महिला समाजात काम करत आहेत . ज्या महिलांचा संघर्ष मोठा आहे ज्या महिलांनी आपल्या कार्यक्षम कर्तुत्वाने नवलौकिक मिळविला आहे. अशा महिलांना आज शबनम न्यूज मीडिया ग्रुप वृत्तसंस्थेच्या वतीनेआदर्श नारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.एखादी महिला पत्रकार काय काय करू शकते हे शबनम सय्यद यांनी दाखवून दिले आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये शबनम सय्यद यांनी आपली एक नवीन ओळख तयार केली आहे. समाजात काम करणाऱ्या महिलांना जर आपण शाबासकी ची थाप दिली, त्यांना पुरस्कार दिले तर या महिला पुढील काळात अनेक चांगले काम करतील या उद्देशाने शबनम सय्यद यांनी आज हा आदर्श नारी पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. महिलांनी अडचणीच्या काळात डगमगून न जाता आपण जे चांगले काम करत आहोत ते सुरू ठेवायला पाहिजे कोणत्याही महिलेने कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता हिमतीने पुढे जायला हवे.महिला अत्याचाराच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा घटना होऊ नये यासाठी महिलांनी आवाज उठवायला हवा. महिलांनी कुठेही कमी पडता कामा नये अत्याचारच्या घटनेच्या विरोधात प्रत्येक महिलेने दुर्गेचे रूप धारण करावे. असे हि तृप्ती देसाई यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संचालिका तथा कार्यक्रमाच्या आयोजक शबनम सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाची प्रस्तावना गजाला सय्यद यांनी मांडली, या पुरस्कार सोहळ्यात चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, अध्यक्ष सरिता अरुण साने, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अश्विनी जगताप यांनी सांगितले की शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने दिला जाणारा आदर्श नारी पुरस्कार हा महिलांना त्यांच्या सामाजिक कामासाठी नवीन ऊर्जा देणार आहे. महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात आणखीन चांगले काम करावे यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. अशा कार्यक्रमातून शबनम सय्यद यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

माजी महापौर उषा माई ढोरे यांनी सांगितले की शबनम सय्यद यांनी दाखवून दिले आहे की एक महिला पत्रकार किती काम करू शकते, त्या दरवर्षी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श नारी पुरस्काराचे आयोजन करत असतात आदर्श नारी पुरस्कार हा महिलांसाठी प्रेरणादायी पुरस्कार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात डॉ. तृप्ती रामाने – धनवटे (संचालक – आकांक्षा ऑर्गनायझेशन ),सौ.अनिताताई सुंदर कांबळे (संस्थापक अध्यक्षा : संविधान महिला मंडळ),सौ. संगीता ज्ञानेश्वर काळे (शिक्षिका ,सातारा),सौ. सुप्रिया महेश चांदगुडे (संस्थापिका – आधार महिला मंडळ),सौ. पुनम संतोष म्हस्के (सामाजिक कार्यकर्त्या),सौ.अश्विनी विशाल पवळ- सरोदे (आशा वर्कर ),सौ. प्रीती संजय मराठे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ. सोनाली संदीप गाडे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ. अश्विनी बाळासाहेब घारे (अध्यक्ष एकता प्रतिष्ठान डोणे, मावळ),श्रीमती. मालन बबनराव घुले (वारकरी कीर्तनकार), सौ. मीना चंद्रमणी जावळे (आम आदमी पक्ष शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड),श्रीमती कमल उत्तम सोनजे (कवयित्री लेखिका) या आदर्श महिलांना आदर्श नारी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.

तर पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक, शैक्षणिक , राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला. या मध्ये सौ.अंजू कोंडीराम सोनवणे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ. शोभा संभाजी पगारे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ. कविता एकनाथ खराडे (संस्थापक – जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठान),सौ.पुनम विनयकुमार विश्वकर्मा
(उद्योजिका),सौ.सुप्रिया सुनिल सोलांकुरे (सामाजिक कार्यकर्त्या),सौ.सायली कुलकर्णी (महिला पत्रकार),श्रीमती कुसुम रामचंद्र दळवी (वृत्तपत्र विक्रेत्या),सौ अर्चना गजानन देशमुख (मेकअप आर्टिस्ट),सौ पुष्पा प्रदीप शेळके (राष्ट्रवादी शहर महिला संघटिका),सौ.माया सूर्यकांत मुळे (शिक्षिका) यांचा विशेष सन्मान करण्यात आला .

तर उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा महिला बचत गटांचा हि सन्मान करण्यात आलाया मध्ये सरस्वती महिला बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, राजमाता जिजाऊ महिला बचत गट,भिमाई महिला बचत गट, गृहलक्ष्मी महिला बचत गट, रिद्धी महिला बचत गट, सुवर्ण महिला बचत गट, श्रीमती धरूबाई महिला सोशल फाउंडेशन, वुमन पावर महिला बचत गट, रमाई महिला बचत गट या बचत गटांचा सन्मान करण्यात आला .

या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंग वालिया, , संजय मराठे यांच्यासह शेकडो महिलांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या शेवटी आसिया इनामदार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here