स्वच्छ सुंदर मुलुंड पूर्व हरवले धुळीच्या लाटेत

मुलुंड

मुंबई (उपसंपादक चंद्रशेखर आठल्ये) : मुंबईची सुरवात ज्या पूर्व दृतगती मार्गापासुन होते तेथे वसलेले हिरवेगार शहर म्हणून मुलुंड पूर्वची ओळख. मराठमोळी प्रामाणिक मध्यम वर्गीय वस्ती, मोठे मैदान, भरपूर बगीचे, थंडगार हवामान असलेले शांत सुंदर , स्वच्छ परीसर या जोडीला कर्तव्य दक्ष जागरूक नागरीक, आरोग्याची काळजी असणारे, खेळात रमणारे मुलुंड , सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.

 

 

आज मुलुंड पूर्वे कडील नागरीकांना परीसरात चालु असलेल्या बांधकामाच्या धुळीचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. हळु हळू या परिसरातील गर्दीही वाढत आहे. रस्त्यांवर सुरू असलेली डागडुजींची कामे ,कचर्‍याचे साम्राज्य, रस्त्यावरील फेरीवाले,रस्त्यावरील अवैध पार्किंग, गॅरेजेस यांचा प्रचंड त्रास नागरीक नाहक सोसत आहेत.

महानगर पालिका प्रशासनास विनंती आहे की बांधकामाच्या धुळीचा त्रास कमी होण्यासाठी मुलुंड पूर्व मधील रस्त्यांवर सकाळी पाण्याचा शिडकाव करावा परिणामी धुळीचा त्रास नागरीकांना कमी प्रमाणात होईल. महानगर पालिकेने याची नोंद घ्यावी , टाटा कॉलनी परिसरात राहणारे श्री निवतकर तसेच इतर सिनिअर मंडळींनी त्यांना अशा गोष्टीमुळे त्रास जाणवतोय असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here