शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रकाश हॉलमध्ये श्री. चंद्रकांत विठ्ठल जोशी सरांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री.जोशी सर ३१ वर्ष आणि दोन महिने प्रदीर्घ सेवा केल्यानंतर शासकीय नियमानुसार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत. सरांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून प्रशालेने यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन केले. सरांना वाजत – गाजत कार्यक्रम स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी प्रशालेच्या स्काऊट आणि गाईड पथक तसेच ढोल ताशा पथकाने पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते. कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्य धीरूभाई कल्याणजी, शाळा समिती सदस्य श्री.गिरीश पारख, प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, माजी प्राचार्य श्री. सुधींद्र देशपांडे, श्री.रामदास दरेकर, श्री. विजयकुमार जोरी, श्रीमती मधुमालती संधीर, श्री.भीमराव माने, उपप्राचार्य मारुती तारू, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनीताई आंबेकर, प्रशालेचे मुख्य लिपीक श्री. कुंडलिक आंबेकर, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.मिलिंद शेलार, मावळ तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.अतिश थोरात, श्री.दिवेकर, चिरंजीव श्री.शुभम जोशी आणि सुनबाई श्रीमती उत्कर्षा जोशी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रसंगी शिक्षकांच्या मनोगताची पी.पी.टी सादर करण्यात आली. चि.गौरव गोणते याने सुंदर स्वागत सादर केले. प्रशालेच्यावतीने श्री.चंद्रकांत जोशी आणि श्रीमती चित्रा जोशी यांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
कला शिक्षक संघाच्या वतीने श्री. चंद्रकांत जोशी यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन श्री.अतिश थोरात यांनी केले. त्याचबरोबर श्री.धनंजय काळे, श्री.महेश चोणगे आणि श्री.राजू दिवेकर यांनी जोशी सरांसाठी सुंदर असे गाणे सादर केली. श्री.विक्रम शिंदे यांनी श्री.चंद्रकांत जोशी यांचे सुंदर स्केच तयार करून त्यांना प्रदान केले. श्री.चंद्रकांत जोशी यांच्या विनंतीला मान देऊन विविध विद्याशाखेमधून प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, श्री.हरिभाऊ कुलकर्णी आणि श्रीमती चित्रा जोशी यांनी आपली मनोगते सादर करतांना जोशी सरांच्या कार्याची वर्णन करत त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी आपल्या मनोगता मधून श्री.चंद्रकांत जोशी सरांच्या कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर जोशी सरांची विनोदी किस्से सांगितली. पुढे ते म्हणाले की, जोशी सर म्हणजे विद्यार्थी प्रिय शिक्षक, आपल्या कार्याशी प्रामाणिक, तत्पर आणि हजर जबाबी व्यक्तिमत्त्व आहे.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाही डॉ. सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी श्री.जोशी सरांना शुभेच्छा दिल्या. श्री.चंद्रकांत जोशी यांनी आपल्या केलेल्या सन्मानाला उत्तर देताना म्हटले की, “मी विद्या प्रसारिणी सभा आणि व्ही. पी.एस हायस्कूल यांचा कायम ऋणी राहील.” त्याचबरोबर त्यांनी सभेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी आपल्या विनोदी शैली मधून केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ तर आभार श्रीमती ज्योती डामसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती, कला शिक्षक, प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी जोशी दांपत्याच्या वतीने स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.







