नाशिक (उपसंपादक इजि कुबेर जाधव) : देवळा तालुक्यातील भउर येथील प्रगतिशील युवा शेतकरी प्रविण जिभाउ पवार यांना आधुनिक शेतीची आवड असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय उपभोग्ता समिती तर्फे प्रविण जिभाउ पवार यांना राष्ट्रीय स्तरावरील क्रुषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, त्यांना अतिशय मानाचा पुरस्कार मिळाला म्हणून त्यांच्या भउर येथील शेतातील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांचा गौरव व सत्कार करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, जिवन विमा विभागाचे अधिकारी केदा पवार, डॉ जे डी, पवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन दिपक पवार,भउर चे पोलिस पाटील भरत पवार, विलास पवार,केदार पवार, वैजु पवार आदी उपस्थित होते.







