सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज दाखल केलेल्या दोन उमेदवारांमध्ये सौ. स्वप्नाली गणेश गोडसे व सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे यांचा समावेश आहे.
उपनगराध्यक्ष मनोज कुंभार व सौ. आरती काळे हे गोडसे यांचे सूचक व अनुमोदक आहेत. तर भाजपचे जयवंत माधवराव पाटील व ओंकार दिलीप चव्हाण हे सौ. बनसोडे यांना सूचक व अनुमोदक आहेत. दोन्ही अर्ज छाननीत पात्र ठरले आहेत.
गुरूवार दि. २७ मार्च रोजी १० ते १२ यावेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दोन पैकी एक अर्ज माघारी निघाला नाही तर शुक्रवार दि . २८ रोजी मतदान होईल . या सर्वसाधारण महिला आरक्षित नगराध्यक्षा पदाच्या निवडी कडे वडूजकरांसह माण विधानसभा मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.







