हिमाचलमध्ये मनिकर्ण गुरुद्वाराजवळ भूस्खलन : ६ लोकांचा जागीच मृत्यू

भूस्खलन

कुल्लू (वृत्तसंस्था) : जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. मणिकर्णच्या गुरुद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. गुरुद्वाराजवळील झाड कोसळल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर रस्त्याच्या किनाऱ्यावरील झाडाखाली बसल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

 

हिमाचलमध्ये भूस्खलन झाल्यानंतर डोंगराचा ढिगारा झाडावर पडला. त्यानंतर झाड कोसळून रस्त्यावर पडलं. त्यामुळे रस्त्याच्या किनाऱ्यावर बसलेल्या लोकांवर हे झाड कोसळलं. या दुर्घटनेत एक विक्रेत्याचाही मृत्यू झाला आहे. तर कारमध्ये असणाऱ्या दोघांसहित तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना घटनास्थळी ६ जणांचे मृतदेह आढळले.

 

पोलिसांनी ६ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. एडीएम कूल्लू अश्वनी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. आता घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचं पथक आहे. भूस्खलन झाल्यामुळे कुल्लूला मणिकर्णहून जोडणारा रस्ता ढिगाऱ्यामुळे बंद झाला आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here