मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील,गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख,माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह श्री रुक्मिणी गर्भगृह, श्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबी, बाजीराव पडसाळी, महालक्ष्मी मंदिर आदी कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here