सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, इत्यादी उत्सवाचे अनुषंगाने मंगळवेढा शहरातील प्रमुख रोड वरून रूट मार्च हा सायंकाळी ५ ते ६.१५ या वेळेत घेण्यात आला आहे .
सदर रूट मार्चमध्ये पोलीस ठाणेकडील ०३ पोलीस अधिकारी, २० पोलिस अंमलदार, ४९ होमगार्ड व तीन शासकीय वाहनांचा समावेश होता. मंगळवेढा शहरामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रूट मार्च करण्यात आला. व मंगळवेढा शांतता राखण्यास सुचित करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी, विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व पोलिस सहाय्यक निरीक्षक अंकुश वाघमोडे.व होमगार्ड. याच्यासह दिनांक २७ मार्च रोजी हा रूट मार्च करण्यात आला.







