वडूज येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी समर्थ

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : वडूज येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात “, श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दि. २८ ते ३१ मार्च अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

 

दिनांक २८ रोजी सकाळी अभिषेक महापूजा आरती सकाळी १० वाजता कोठी पूजन, दुपारी २ ते ५ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथीचे सामुदायिक पारायण व रात्री ७ वाजता महाआरती. दिनांक २९ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक महापूजा,आरती, सकाळी १० ते १२ लघुरुद्र व होम हवन रात्री ७ वाजता महाआरती.

रविवार, दिनांक ३० रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक,महापूजा, आरती, सायंकाळी ५ वाजता गायिका वेदांतिका घारगे व शिवकृपा भजन मंडळ खरशिंगे यांचे श्री स्वामी समर्थ व दत्त भक्तीगीत गायन व भजनाचा कार्यक्रम, रात्री ७ वाजता महाआरती. सोमवार,दिनांक 31 मार्च रोजी प्रकट दिन सोहळा असून सकाळी ७ वाजता अभिषेक,पूजा व महाआरती,सकाळी १० ते १२ स्वामी भक्त सौ.नेत्रा भंडारे, विटा यांचे स्वामी कृपा या विषयावर कीर्तन, दुपारी १२.३० वाजता श्री स्वामी समर्थांची पालखी प्रदक्षिणा दुपारी १ वाजलेपासून रात्री भक्तगण येईपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

दुपार पासून निवेदक प्रा. राहुल कोळी यांचा भक्ती व भाव गीतांचा कार्यक्रम होणार आहे.यंदाचा महाप्रसादाचा मान स्वामी भक्त शिवाजी नाना राजगे व सुरज वसंत पुकळे व परिवार यांना मिळाला आहे. याच दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट व आयुष्य ब्लड बँक,वडूज यांचे वतीने रक्तदान महाशिबिर आयोजित केले आहे.जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी रक्तदान करून मानव कार्यास सहकार्य करावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here