नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जिल्ह्यातील सटाणा बाजार समिती निवडणुकीत सोसायटी आणि पंचायत सदस्य मतदार असल्याने गावोगावचे वजनदार मतदारांचा भाव चांगलाच वधारला आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीना उत आला होता, सर्वच प्रस्थापित एका गटात एकवटले आहेत, त्यामानाने समोरील यशवंत पॅनलमध्ये प्रस्तावित कोणीही नाही परिवर्तन पंनल मध्ये आर्थिक द्रुष्टया कमकुवत उमेदवार उभे असले तरी शिवसेनेचे तालुका नेते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असण्याचे चित्र आज तरी दिसत आहे, येत्या सोमवारी प्रस्तावित बाजी मारतात की परिवर्तनवादी चमत्कार घडवुन आणतात या कडे लक्ष लागुन आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे उधळले गेले, या निवडणुकीत १७ जागांसाठी ४६ उमेदवार निवडूनुक रिंगणात आपलं नशीब अजमावित आहेत. निवडणुकीत खरी दुरंगी लढत सोसायटी आणि पंचायत गटातुन होत असून डॉ.विलास बच्छाव, माजी सभापती नानाजी दळवी, पांडुरंग सोनवणे ,राघोनाना आहिरे प्रणित* शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे, दक्षिण सोसायटी मा चेअरमन राहुल सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ प्रशांत सोनवणे, शिवसेनेचे अमोल पगार, लालचंद सोनवणे, गजेंद्र बापू चव्हाण व इतर मंडळींच्या नेतृत्वाखाली यशवंत शेतकरी विकास पॅनल ची निर्मिती करण्यात आली आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षीय जोडे बाजूला करून एकदिलाने प्रयत्न केले होते.पण त्यांनाच या बिनविरोध निवड प्रक्रियेत डावलले गेले, परीणामी अंतिम क्षणी* या दुःखावलेल्या मंडळीने*हमारे बगर तुम राज नहीं कर सकते म्हणत आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसत नाराज गटाला सोबत घेत थेट निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने चुरस निर्माण झाली, , सटाणा बाजार समितीची खालावलेली आर्थिक परिस्थिती, प्रस्थापित गटा कडून केला गेलेला मनमानी कारभार व त्यामुळे वाढलेला कर्जाचा बोजा,,हमाल मापाऱ्याचा पगाराचा प्रक्ष्न,यावर प्रचारात जोरदार हल्ला बोल केला, फायद्यासाठी म्हणा किंवा आर्थिक देवाणघेवाणीतुन बाजार समितीची प्रतीमा मलीन केली गेली, फी कपाती मुळे होणारे नुकसान काही कोटीच्या घरात गेले आहे,असा आरोप प्रचार सभांना मधून केला जात असून मतदारांना बाजार समितीची सध्याची आर्थिक स्थिती बाबत आपापल्या परीने अवगत करण्याचा प्रयत्न केला. यात सत्ताधारी आणि प्रस्थापित कोण? हेच मतदारांना समजेनासे झाले आहे.
शेतकरी विकास पंनलचे पारडे जड दिसत असलं तरी,पंनल निर्मितीमध्ये नेत्यांची मोठी दमछाक झाली, उमेदवारांची निवड करतांना त्यांना विभागवार प्रतिनिधित्व देता आले नाही त्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, तालुक्याच्या पश्चिम पट्यसाठी योग्य प्रतिनिधित्व देता आलेल नाही बाजार समितीची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली(?) असून बाजार समिती कडे ४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.सत्तेत येण्यासाठी विरोधकांन कडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.सत्तेत येण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालु असल्याचा घणाघाती आरोप यशवंत पंनलकडुन केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते बाजार समिती निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत निवडणूकीला सामोरे जात आहेत.कांद्याच्या भावासाठी अनेक वेळा, रास्तारोको आणि बाजार समितीचे कामकाज रोखुन धरणारे प्रहार शेतकरी संघटनेचे लढाउ व्यक्तीमहत्त्व असलेले तुषार खैरनार ऐनवेळी यशवंत पंनलमध्ये सामिल झाले आहेत, त्यामुळे यशवंतला चांगलेच बळ प्राप्त झाले आहे.
शेवटच्या दिवशी जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी पक्षीय जोडे, राजकीय वैमनस्य बाजूला सारत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले गेले.पण ज्यांच्या नावांचा उल्लेख टाळला गेला त्यांनी विरोधात एल्गार पुकारत निवडणूक बिनविरोध करण्याचा मनसुबा उधळुत लावत निवडणुकीत तगडे प्रति आव्हान उभे केले, निवडणूकीत काही नेते मंडळींन कडून फक्त एका राजकीय नेत्याला टार्गेट करण्यासाठी व त्यांना या निवडणुकीतून बाजूला सारण्यासाठी सुरूवाती पासूनच राजकीय खेळी खेळली गेली, जीवाभावाच्या लोकांनी ही यात महत्वपूर्ण भूमिका निभावली असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.आरोप- प्रत्यारोपांच्या या रणधुमाळीत मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देतो.व शेवटच्या दिवसात दोन दिवसांत जनशक्ती विरोधात धनशक्ती द्वारे होणारे लक्ष्मी दर्शन काय चमत्कार घडवते? हे पाहाणे औचित्याचे ठरणार आहे.







