आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांचे पथसंचलन

धुळे

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) : आज (दि.२९) सायंकाळी ५ ते ६.१० वाजेच्या दरम्यान गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रा, रमजान ईद , श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, इत्यादी आगामी सण उत्सव अनुषंगाने आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत पथसंचलन मार्च घेण्यात आला.

सदरचा रूट मार्च आझाद नगर पोलीस स्टेशन समोरून मच्छी बाजार येथून निघून बहेलुल चौक, नवभारत चौक, गल्ली नंबर 6, तुकाराम विजय व्यायाम शाळा, माधवपुरा पाला बाजार, मक्का मशिद, मरकज मशिद, मौलवीगंज घड्याळवाली मशीद, सन्मान लॉज, गल्ली नंबर ४, मरीमाता मंदिर, चैनी रोड ,पाच कंदील, साखला पान सेंटर, गोल्ड बिल्डिंग, १२ पत्थर, पोलीस मुख्यालय येथे समारोप या मार्गाने काढण्यात आला.

रूट मार्चमध्ये पोलीस अधीक्षक धुळे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग धुळे, पर्यविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धुळे तालुका पोस्टे, तसेच धुळे शहर उपविभागातील ५ प्रभारी अधिकारी, १२ दुय्यम अधिकारी, ६५ पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड १ एसआरपीएफ प्लॅटून, १ आरसीपी पथक, १ क्यूआरटी पथक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here