वर्धा (विदर्भ संपादक ॲड.चंद्रकांत कराळे) – शासन परिपत्रक 17 ऑगस्ट 2020 नुसार ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड -19 च्या आजारासंबंधित कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे अश्या सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड -19 च्या सर्व कामातून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाने मा. शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे. त्यासाठी मा. शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करायची आहे. कोरोनाच्या आपत्ती काळात शिक्षकांच्या सेवा स्थानिक प्रशासनाकडून कोविड- 19 च्या विविध कामांसाठी बऱ्याच कालावधीपासून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. सध्या काही शिक्षकांची नियुक्ती कंटेनमेंट झोन मध्ये तर काही शिक्षक/ शिक्षिका सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे. सर्व्हेक्षणा दरम्यान शिक्षक / शिक्षीकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता सर्व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण सुद्धा विदयार्थ्यांना द्यावयाचे आहे त्यामुळे कोविड- 19 च्या कामातील सर्व शिक्षकांना 17 ऑगस्ट 2020 च्या शासन परिपत्रकानुसार तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धातर्फे जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे यांचे मार्गदर्शनात व विमाशीचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, कार्यकारी अध्यक्ष पाडुरंगजी भालशंकर व कार्यवाह महेंद्र सालंकार यांचे नेतृत्वात मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी मा. शिक्षणाधिकारी ( माध्य.) जी. प. वर्धा यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी विमाशीचे रवींद्र वाघमारे, शशांक हुलके, सुनील धवणे, प्रमोद खोडे, गिरीश काळे, सौ. स्वाती काळे, सौ. गीता ढेंगळे, सौ.अनिता पोहरे, एस. जी. तेलरांधे, जि.बी. खंडागळे, गिरीश बोरकर, हेमंत माटे, सागर मसराम, सुहास गवते, निलेश भालकर, एम. डी. मून , इंदर ढोले उपस्थित होते







