दुचाकीला धडक दिल्याने पोलिसाने फोडल्या कारच्या काचा

पोलिसाने फोडल्या कारच्या काचा

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : मंगळवारी (दि.१) सांयकाळी सिव्हिल लाइन्स येथील खोखा कॅफेजवळ एका कारची पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक लागल्याच्या भांडणातून त्याने काचा फोडल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा पोलीस कर्मचारी राजकुमार कनौजिया असून अंबाझरी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहे. काल (मंगळवारी) रात्री १० च्या सुमारास एका कारचालकाने कार मागे घेत असताना या पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडण हळूहळू वाढत गेल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरू असताना राजकुमारने रागाच्या भरात मोठी वीट उचलली आणि कारच्या खिडकीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here